Akshay Sabale
भाजपनं वायनाडमधून विद्यमान खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात केरळचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
त्यामुळे राहुल गांधी आणि के. सुरेंद्रन यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या लढतीकडे देशाचं लक्ष राहणार आहे.
के. सुरेंद्रन केरळमधील दिग्गज नेते मानले जातात. सुरेंद्रन भाजपचे कट्टर समर्थक असून, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेताना दिसतात.
भाजपनं 2020 मध्ये सुरेंद्रन यांना प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती दिली होती.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पथानामथिट्टा मतदारसंघातून के. सुरेंद्रन यांना उमेदवारी देण्यात आलेली. पण, सुरेंद्रन यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
2018 मध्ये सबरीमाला प्रकरणी के. सुरेंद्रन यांनी आंदोलन केलं होतं. त्यामुळे एक महिने त्यांना तुरुंगवारीही झाली होती.
2021 च्या विधानसभा निवडणुकीत 'बसपा'च्या उमेदवाराला नाव मागे घेण्यासाठी धमकवल्याचा आरोपही सुरेंद्रन यांच्यावर करण्यात आला होता.
R