Abhijeet Patil : सत्ताधाऱ्यांची ऑफर धुडकावून शरद पवारांना साथ देणारा नेता!

Vijaykumar Dudhale

वाळू व्यावसायिक ते साखर सम्राट

वाळू व्यावसायिक ते साखर सम्राट अशी पंढरपूरमधील अभिजित पाटील यांची ओळख आहे. पाटील सध्या पाच साखर कारखाने चालवत आहेत.

Abhijeet Patil | Sarkarnama

'विठ्ठल'ची निवडणूक जिंकली

अभिजित पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांनी बंद असलेला विठ्ठल साखर कारखाना सुरू केला. शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाची बिलंही दिली.

Abhijeet Patil | Sarkarnama

इन्कम टॅक्सचे छापे आणि भाजप प्रवेशाचे निमंत्रण

अभिजित पाटील यांचे कारखाने आणि पतसंस्थांवर याअगोदरही प्राप्तीकर विभागाचा (इन्कम टॅक्स) छापा पडला होता. सलग दोन दिवस छापेमारी सुरू होती. त्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पंढरपुरात येऊन अभिजित पाटील यांना भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले होते.

Abhijeet Patil | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजप प्रवेशाची ऑफर नाकारून अभिजित पाटील यांनी काही दिवसांनंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पवारांनी त्यांना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत संकेत दिले होते.

Abhijeet Patil | Sarkarnama

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते

अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेतेही अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे अभिजित पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते बनले.

Abhijeet Patil | Sarkarnama

फसवणुकीचा गुन्हा दाखल

राज्य सहकारी बॅंकेचे 430 कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याप्रकरणी शिखर बॅंकेच्या तक्रारीनुसार कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला होता. पाटील यांनी पुण्यातील डीआरटी न्यायालयात धाव घेऊन कारवाईवर स्थगिती मिळविली होती.

Abhijeet Patil | Sarkarnama

विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई

डीआरटी न्यायालयाने गुरुवारी रात्री स्थगिती उठवल्यानंतर राज्य सहकारी बॅंकेने आज तडकाफडकी तीन गोदामे सील करत विठ्ठल कारखान्यावर पोलिस बंदोबस्तात जप्तीची कारवाई केली.

Abhijeet Patil | Sarkarnama

कितीही किंमत मोजावी लागली तर चालेल

शिखर बॅंकेने कारवाई केल्यानंतरही शेतकऱ्यांच्या उसाची देणी स्वतःला गहाण ठेवून देऊ. कितीही किंमत मोजावी लागली तर चालेल, पण विठ्ठल साखर कारखाना चालू ठेवण्यात येईल, असे अभिजित पाटील यांनी स्पष्ट केले.

R

Abhijeet Patil | Sarkarnama

काँग्रेसच्या संकटमोचकाची मुलगी राजकारणात? माजी मुख्यमंत्र्यांची आहे नातसून...

Aishwarya DKS Hegde | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा