Pradeep Pendhare
एकनाथ खडसे महाराष्ट्रातील राजकारणी असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असण्यापूर्वी ते भाजपमध्ये सक्रिय नेते होते. त्यांचा पुन्हा भाजपमधील प्रवेश रखडला आहे.
महसूल, पशू संवर्धन, दुग्धविकास, मत्स्यपालन, राज्य उत्पादनशुल्क आणि अल्पसंख्याक मंत्री म्हणून काम केलं आहे.
कोथळी गावचे सरपंच बनून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरवात केली होती. 2009 ते 2014 या कालावधीत ते महाराष्ट्र विधानसभेत भाजपतर्फे विरोधी पक्षनेते होते.
21 ऑक्टोबर 2020 मध्ये एकनाथ खडसेंनी भाजप सोडली आणि 23 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पक्षप्रवेश केला.
शरद पवारांची राष्ट्रवादी सोडली असून लवकरच ते भाजपमध्ये स्वगृही परतण्याचा प्रयत्न करत असून, त्यांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त अद्यापही ठरला नसल्याने संभ्रम आहे.
1989-1990 विधानसभा निवडणुकीत खडसे पहिल्यांदा एदलाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर 1990 ते 2014 पर्यंत खडसे मुक्ताईनगर मतदारसंघातून अपराजित राहिलेत.
एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत केंद्रीय नेतृत्वानं विचार केला असून, गणेशोत्सवानंतर निर्णय होणार असल्याचे संकेत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.
भाजप प्रवेशात अडथळे येत असल्याने एकनाथ खडसेंनी राज्यातील भाजप नेत्यांविरोधात पुन्हा टीकास्त्र सोडत, अडचणी वाढवून घेतल्यात.