Jagdish Patil
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना सत्तापालटानंतर देश सोडून भारतात आल्या होत्या.
हसीना यांच्याबाबत बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस वादग्रस्त विधाने करत आहेत.
अशातच हसीना यांचा अवामी लीग नेत्यासोबतचा 10 मिनिटांचा फोन कॉल रेकॉर्डिंग लीक झाल्याचा दावा ढाका ट्रिब्यूनने केला आहे.
या व्हायरल कॉलमुळे सोशल मीडिया आणि बांगलादेशात नवा वाद सुरू झाला आहे.
व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमध्ये अवामी लीगच्या नेत्यांना येत असलेल्या अडचणींबद्दल चर्चा केल्याची माहिती आहे.
शेख हसीना आणि तनवीर नावाच्या व्यक्तीमध्ये हे संभाषण झाले आहे.
यामध्ये शेख हसीना आपल्या 113 गुन्हे सध्याच्या सरकारने दाखल केल्याचं सांगतात.
बांगलादेशात परतल्यास कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते, अशी भीती त्या समोरच्या व्यक्तीसमोर व्यक्त करत आहेत.
सर्वात महत्वाचं म्हणजे आपण बांगलादेशाच्या खूप जवळ असून गरज पडल्यास परत येऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.