सरकारनामा ब्यूरो
काही दिवसापूर्वी अभिनेता सैफ अली खान याच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. यात आता हल्लेखोरला पकण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
आज (ता.21) ला मुंबई पोलिसांनी या हल्ल्याचा आरोपी शरीफुल याला सैफ अली खानच्या घरी हल्ल्याचे सीन रिक्रिएशनसाठी नेण्यात आले होते.
आरोपीने सैफ अली खानवर हा हल्ला का आणि कसा केला होता? हे कळण्यासाठी हे सीन रिक्रिएशन करण्यात आले.
मुंबई पोलिस सर्व घटनेची माहिती गोळा केल्यानंतर एक तासानंतर आरोपीसह सैफच्या घरातून बाहेर आले.
आरोपीने सांगितले की, इमारतीतील सातव्या मजल्यापर्यंत तो चालत गेला. येथून डक्ट एरियातून पाईपच्या मदतीने तो बाराव्या मजल्यावर गेला .
त्यावेळी शरीफुल मुलांच्या रुममध्ये गेला. त्यावेळी जेहच्या आया अरीमिया फिलिप्सशी त्यांचा सामना झाला. तेव्हा आरोपीने एक कोटी रुपयाची मागणी केली.
अरीमिया आरडाओरडा केल्याने सैफ रुममध्ये आला आणि त्यांनी आरोपीचा सामना केला.
आज पाच दिवसानंतर सैफ अली खानला रुग्णालयतून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.