सरकारनामा ब्यूरो
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक लोकांनी उपस्थिती लावली. यात भारताचे परराष्ट्रमंत्री ए.स जयशंकर, मुकेश अंबानी त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांचीही उपस्थिती आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याआधी वॉशिंग्टन डीसी येथे सर्व मंडळीसाठी खास डिनर पार्टी आयोजित केली होती. यावेळी नीता अंबानी यांच्या पेहरावाची चर्चा सगळीकडे होत आहे.
डिनर पार्टीवेळी नीता अंबानी यांनी भारतीय संस्कृती जपत काळ्या रंगाची साडी नेसली होती.
या साडीची खासियत म्हणजे ही पारंपारिक कांचीपुरम सिल्क साडी आहे. यावर कांचीपुरमच्या भव्य मंदिरांच्या अध्यात्मिक आणि ऐतिहासिक सार दाखवणारे डिझाइन आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मास्टर कारागीर बी. कृष्णमूर्ती यांनी विणलेली ही 'कस्टम-मेड' साडी आहे.
साडीला मॅच असा हिरवा पन्नाचा सुंदर हिऱ्याचा हार, मॅचिंग कानातले आणि त्यांच्या हातात हिरवा रंगाच्या बांगड्या त्यांनी यावेळी घातल्या होत्या.
या साडीवर त्यांनी काळ्या रंगाचे स्टाइलिश जॅकेटही घातले होते.
यावेळी नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी अनेक नेतेमंडळीबरोबर फोटो काढले.