Akshay Sabale
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल अखेर 11 वर्षांनी निकाल लागला आहे. याप्रकरणातील पाच पैकी तीन आरोपी निर्दोष सुटले आहेत.
सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप आणि 5 लाखांचा दंड, अशी शिक्षा 'सीबाआय'च्या विशेष न्यायालयानं सुनावली आहे. आता दाभोलकर हत्येचा घटनाक्रम जाणून घेऊया.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून
पुणे पोलिसांकडून चौकशीला सुरुवात
पुणे पोलिसांकडून ‘सीबीआय’कडे तपासाची सूत्रे
‘सीबीआय’कडून दोन वर्षांनी पहिला आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला पनवेलमधून अटक केली.
डॉ. वीरेंद्रसिंह तावडेवर हत्या आणि हत्येचं षडयंत्र रचल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल.
महाराष्ट्र एटीएसकडून वैभव राऊत आणि शरद कळसकर याला अटक.
व्यवसायाने वकील असलेले संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला सीबीआयकडून अटक, पुनाळेकर आणि विक्रम भावेची न्यायालयाकडून जामिनावर सुटका.
दाभोलकर हत्याप्रकरणात आरोपी म्हणून दाखविलेल्या सनातन संस्थेशी संबंधित सारंग आकोलकर आणि विनय पवार यांची नावे दोषारोपपत्रातून वगळली.
पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने दाभोलकर हत्याप्रकरणी अटक केलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात दोषारोप निश्चित केले.
आठ वर्षांनी 2021 मध्ये ‘सीबीआय’ने अटक केलेल्या आरोपींविरोधात खटला सुरू
10 मे 2024 सुमारे 11 वर्षांनी डॉ. दाभोलकर खटल्याचा निकाल लागला आहे.