Eknath Shinde News : "राज ठाकरे कोत्या नव्हे, तर मोकळ्या मनाचे", मुख्यमंत्री शिंदे असं का म्हणाले?

Akshay Sabale

राज ठाकरेंचं कौतुक -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचे कौतुक करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

eknath shinde | sarkarnama

राज ठाकरे मोठ्या मनाचे -

राज ठाकरे हे मोठ्या मनाचे व्यक्ती असून कोत्या मनाचे नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आले.

eknath shinde | sarkarnama

दोन टप्प्यात महायुतीला यश -

राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उभे आहेत. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळेल अशी परिस्थिती आहे.

eknath shinde | sarkarnama

विजयी होणार -

पहिल्या टप्प्यातील मतदानात महायुती प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहे, असे मी खात्रीने सांगू शकतो.

eknath shinde | sarkarnama

कडक उन्हाळा -

एवढा कडक उन्हाळा असून देखील कार्यकर्ते मतदारांना केंद्रापर्यंत आणत असल्याचे मी पाहिले.

eknath shinde | sarkarnama

मतदान टक्केवारी कमी -

उन्हामुळे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. मात्र, आता पुढील टप्प्यांमध्ये मतांचा टक्का वाढवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

eknath shinde | sarkarnama

मनसेचे पदाधिकारी 'दिले से' कामाला -

मी राज्यात सर्व ठिकाणी फिरत आहे. कोल्हापूरमध्ये आणि हातकणंगले मतदारसंघात मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी 'दिल से' कामाला लागले असल्याचे दिसून आले.

eknath shinde | sarkarnama

पोटात एक अन् ओठात एक नाही -

राज ठाकरे मोकळ्या मनाचे व्यक्ती आहेत. जे मनात आहे तेच बोलतात. पोटात एक आणि ओठात एक असे त्यांना जमत नाही.

eknath shinde | satrkarnam

राज ठाकरे महायुतीबरोबर -

त्यामुळे राज ठाकरे यांनी महायुतीचा प्रचार करायचा निर्णय घेतला असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

eknath shinde | sarkarnama

NEXT : घोटाळ्यांचे आरोप, ईडी चौकशी; रवींद्र वायकर यांची संपत्ती किती?

ravindra waikar | sarkarnama