Rashmi Mane
अभिनेते आमिर खान यांच्या पुढाकारातून सुरू झालेला सत्यमेव जयते 'फार्मर कप' आता संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जाणार आहे.
महाराष्ट्र सरकारने नुकताच शासन निर्णय काढून हा उपक्रम राज्यभर सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
मंत्रालयात आमिर खान यांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या बैठकीत या उपक्रमाची रूपरेषा आखण्यात आली.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतीमालाचे उत्पादन वाढवणे हा फार्मर कपचा मुख्य उद्देश आहे.
शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल.
कृषी विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राज्यभर राबवला जाणार आहे.
या उपक्रमासाठी सरकारने 14 सदस्यीय समिती तयार केली असून तिचे अध्यक्ष कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी आहेत.
समितीत आमिर खान, किरण राव, डॉ. आनंद बंग, विलास शिंदे, डॉ. शरद गडाख यांसह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.