Rashmi Mane
मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आंदोलनाची ज्वाला पेटली आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला आहे.
मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा बांधवांचा जनसागर जमला आहे. हजारो आंदोलनकर्ते गावागावातून येथे दाखल झाले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. सरकारने फक्त एका दिवसाची परवानगी दिली आहे.
"सरकारने गोळ्या झाडल्या तरी मागे हटणार नाही, डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय मुंबई सोडणार नाही!" अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली आहे.
आझाद मैदानाची क्षमता संपली असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि फोर्ट परिसरातही आंदोलकांची गर्दी उसळली आहे.
मोठ्या प्रमाणात लोकांच्या गर्दीमुळे दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली आहे.
मराठा बांधवांचा निर्धार आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील.