Deepak Kulkarni
बॉलिवूडचे लोकप्रिय विनोदी अभिनेते असरानी यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला.
असरानी यांचं पूर्ण नाव गोवर्धन असरानी होतं. 1 जानेवारी 1941 ला त्यांचा जन्म जयपूरमध्ये झाला. त्यांनी 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं.
विनोदाचं टायमिंग आणि अनोख्या शैलीमुळं ते लोकप्रिय ठरले. शोले चित्रपटातील त्यांचं अंग्रेजो के जमाने के जेलर हा डायलॉग असणारी जेलरची भूमिका लोकप्रिय ठरली होती.
उत्तम बुद्धिमत्ता असलेला आणि चित्रपट व्यवसायाची ओळख असलेला कलाकार म्हणून असरानी यांच्याकडे पाहता येतं.
आपल्या विनोदी भूमिकांनी बॉलिवूड गाजवलेल्या असरानी यांनी राजकारणातही केला होता प्रवेश केला होता.
असरानी यांनी 2004 मध्ये काँग्रेसचं सदस्यत्व घेतलं होतं.
लोकसभा निवडणुकीदरम्यान ते काँग्रेस पक्षाच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी झाले होते.
'आज की ताजा खबर'मधील त्यांच्या अफलातून कामगिरीसाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पुरस्कारही मिळाला होता.
कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुणे फिल्म इन्स्टिट्यूट म्हणजेच आजच्या एफटीआयआयमध्ये प्रवेश घेतला आणि अभिनयाचा कोर्स पूर्ण केला.