Air India Himroo design : 'हिमरू'चा साज, बोइंग विमानाच्या शेपटीवर; एअर इंडियाकडून छत्रपती संभाजीनगरच्या कलेचा गौरव

Pradeep Pendhare

'हिमरू' काय आहे?

पर्शियन नजाकत आणि भारतीय कलाकुसर, असा अफलातून संयोग असलेले ‘हिमरू’ वस्त्र छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे.

Air India Himroo design | Sarkarnama

'बोइंग'वर साज

'हिमरू'च्या डिझाइनचा वापर एअर इंडिया एक्स्‍प्रेसच्या ताफ्यातील बोइंग 737 विमानाच्या शेपटीवर करण्यात आला.

Air India Himroo design | Sarkarnama

कला अन् वारसा

कला आणि वारसा ज्या छत्रपती संभाजीनगरात आहे, याच शहराने 'हिमरू'च्या माध्यमांतून अनेक शतके वस्त्रकलेच्या इतिहासात आपले स्थान निर्माण केले.

Air India Himroo design | Sarkarnama

सांस्कृतिक देणगी

फुलांच्या वेली आणि जाळी पॅटर्न हे वैशिष्ट्य असलेली 'हिमरू' वीणकला हे छत्रपती संभाजीनगरच्या हिमरू वीणकरांची कला आणि अनेक शतकांची सांस्कृतिक देणगी आहे.

Air India Himroo design | Sarkarnama

'एअर'कडून कौतुक

ही कला सर्वांनाच भूतकाळाशी जोडणारी असल्याने या अजोड कलेचा सन्मान म्हणून बोइंग विमानाच्या शेपटीवर 'हिमरू'चे डिझाइन वापरण्यात आल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.

Air India Himroo design | Sarkarnama

'बोइंग'वर कोणतं डिझाइन

एअर इंडिया एक्स्‍प्रेसच्या बोइंग विमानावरील 'हिमरू'ची डिझाइन ही अजिंठा लेणी क्रमांक 2 मधील मंडला आर्ट आहे, अशी माहिती हिमरू फॅब्रिकचे संचालक फैजल कुरेशी यांनी दिली.

Air India Himroo design | Sarkarnama

'हिमरू'चा इतिहास

मोहम्मद तुघलकाने इसवी सन 1326 मध्ये दिल्लीहून दौलताबाद म्हणजे, देवगिरीला स्थलांतर केले. त्यात हस्तकौशल्याचे काम करणाऱ्या कुशल कारागिरांचाही समावेश होता.

Air India Himroo design | Sarkarnama

हस्तकलेचं केंद्र

औरंगजेबच्या काळात हे कारागीर दौलताबादहून छत्रपती संभाजीनगरला आले. या काळात शहर हस्तकलेचे प्रमुख केंद्र झाले.

Air India Himroo design | Sarkarnama

राजेशाही वस्त्र

पर्शियन नजाकत आणि भारतीय कलाकुसर, असा अजोड संगम असलेले 'हिमरू' वस्त्र हे राजेशाही वस्त्र म्हणून ओळखले जाते, ते आता अवघ्या जगाचे झाले आहे.

Air India Himroo design | Sarkarnama

NEXT : आरोग्य योजनांसाठी वॉर रूम...

येथे क्लिक करा :