Jagdish Patil
शिवसेना नेता आणि अभिनेता गोविंदाच्या स्वत:च्या बंदुकीतून मिसफायर झाल्याची धक्कादायक घटना घडली.
रिव्हॉल्वरमधून सुटलेली गोळी लागल्याने तो जखमी झाल्यानंतर ऑपरेशनद्वारे पायातील गोळी काढण्यात आली आहे.
'तुमच्या सगळ्यांच्या आणि आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे मी बचावलो, मी डॉक्टरांचे आभार मानतो. माझ्यासाठी प्रार्थना केली त्यासाठी धन्यवाद', अशा शब्दात गोविंदाने सगळ्याचे आभार मानले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गोविंदाला फोन करून त्याच्या तब्येतीची चौकशी केली.
बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता ते शिवसेना नेता हा गोविंदाचा प्रवास कसा आहे जाणून घेऊया.
आपल्या अभिनयाच्या जोरावर गोविंदाने भारतीयांच्या मनात एक विशेष स्थान मिळवलं आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
2004 साली गोविंदाने भाजपचे राम नाईक यांना पराभूत केलं होतं, त्यानंतर तो अचानक राजकारणापासून दूर गेला.
2024 नंतर गोविंदाने चित्रपटातही काम करणंही कमी केलं, त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेतील प्रवेशानंतर आजच्या मिसफायरमुळे तो पुन्हा चर्चेत आला.