Pradeep Pendhare
मतदान म्हणजे, लोकशाहीचा उत्सव, तरीही राज्यात लोकसभा निवडणुकीवेळी कमी मतदानावरून निवडणूक आयोगानं चिंता व्यक्त केली.
मुंबई, कल्याण, पुण्यात, नाशिक, औरंगाबाद इथं मतदानाचा टक्का 40 ते 47 टक्के असल्याबाबत चिंता व्यक्त केली.
मतदारयादीत नावे नसलेल्यांची नावे मतदार यादीत नोंदवून घेण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
मतदानाच्या दिवशी कामगार आणि कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा देणे बंधनकारक असून, त्याच्या अंमलबजावणीवर लक्ष देण्याच्या सूचना.
वयाची 85 वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांना घरीही मतदान करण्याची सोय असून, त्याचे अर्ज भरून घ्यावेत. तसंच मतदानांना रांगेत उभं ठेवू नका.
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्याबाबत विचाराधीन असल्याचं मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.
राज्यात 350 केंद्रे युवा कर्मचारी, 388 केंद्रे महिला कर्मचारी आणि 299 मतदान केंद्रे अपंग, दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून संचालित होणार