Amol Sutar
अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या किरण मानेंचा जन्म 5 एप्रिल 1970 रोजी सातारा जिल्ह्यामधील मायणी गावामध्ये झाला.
शाळेमध्ये असताना अभिनय, नाटक अशा गोष्टींबद्दल त्यांच्या मनामध्ये आवड निर्माण झाली. सातारा पॉलिटेक्निक कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली आहे.
किरण माने 2022 मध्ये स्टार प्रवाहवरील 'मुलगी झाली हो’ या मालिकेत भूमिका साकारत होते. याच मालिकेतून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
'मुलगी झाली हो’ मालिकेत असनाता त्यांनी सोशल मीडियावर भाजपविरोधी भूमिका घेत पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे त्यांना या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
त्यानंतर हा वाद खूप वाढला आणि चिघळला होता. मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत भूमिका मांडली होती.
'बिग बॉस मराठी' फेम किरण माने यांनी आता राजकारणात एंट्री केली असून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले आहे.
किरण माने यांनी सुरुवातीला गावामध्ये विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीचं दुकान उघडलं. तेथे अभिनयाच्या कोर्सची जाहिरात दिसली. ती पाहून अभिनय शिकण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी ‘श्री तशी सौ’, ‘परफेक्ट मिसमॅच’, ‘गोविंद घ्या गोपाळ घ्या’, ‘मनोमिलन’ अशा नाटकांमध्ये तर ‘स्वराज्य’, ‘ऑनड्युटी 24 तास’, ‘श्रीमंत दामोदर पंत’ यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले. ‘अपहरण’ या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले.
राजकीय वादातून 'मुलगी झाली हो' मालिकेतून किरण माने यांना काढल्यानंतर पत्नी ललिता माने यांनी राज्य महिला आयोगाकडे धाव घेत पतीवर झालेल्या अन्यायाची दाद मागितली होती.