Roshan More
अभिनेता नाना पाटेकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सातारातील दरेगावामधील शेतात गेले होते.
नाना पाटेकर यांच्यासोबत एकनाथ शिंदे हे देखील होते. शिंदेंनी आपले शेताची माहिती नाना पाटेकरांना दिली.
नाना पाटेकर यांनी शिंदेंच्या शेतात अननसाच्या झाडाची लागवड केली.
एकनाथ शिंदें यांनी फणसाचे फळ देत नाना पाटेकर यांचे स्वागत केले.
शेतात पिकलेल्या स्ट्रॉबेरी, चिकू, आंबे यांसारख्या विविध फळांचा मनसोक्त आस्वादही नाना पाटेकर यांनी घेतला.
शेती आणि मातीशी नाळ जोडलेल्या नानांसोबत गप्पा मारण्यात वेळ कसा गेला ते कळलेच नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.