Jagdish Patil
128 वर्षीय योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी शनिवारी (ता.03) रात्री जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने वाराणसीवर शोककळा पसरली आहे.
अखेरच्या दर्शनासाठी त्यांचे पार्थिव दुर्गाकंड येथील आश्रमात ठेवले जाणार असून सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
पंतप्रधान नरेंद्र मोदीही शिवानंद बाबांच्या योगाभ्यासाचे अनुयायी होते. 3 वर्षापूर्वी केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवलं होतं.
नुकतंच प्रयागराज येथे शिवानंद बाबा यांचा कॅम्प लागला होता. यावेळी त्यांनी महाकुंभात पवित्र स्नान देखील केलं.
8 ऑगस्ट 1896 साली शिवानंद बाबा यांचा बंगालच्या श्रीहट्टी जिल्ह्यात जन्म झाला. भूकबळीमुळे आई-वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ते अर्धपोटी जेवण करायचे.
गुरूंच्या आदेशानंतर ते जगभ्रमंती करून योग साधना करू लागले. 1977 साली वृंदावनला आल्यानंतर भारत भ्रमंती करत त्यांनी अनेकांना योग शिकवला. अखेरच्या काळात ते वाराणसीत रमले.
रोज पहाटे 3 ला उठणे, नेहमी थंड पाण्याने अंघोळ आणि त्यानंतर १ तास योगा करण हे त्यांच्या निरोगी आयुष्याचं गुपित होतं.