Chaitanya Machale
मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेले अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे आंदोलन करत आहेत.
मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी भेट घेतली.
शिंदे एक प्रसिद्ध अभिनेते म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांनी केवळ चित्रपटात नव्हे तर अनेक मराठी नाटकांत देखील काम केले आहे.
शिंदे यांनी मराठीच नवे तर तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, गुजराती, हिंदी चित्रपटात काम केले आहे. इतर राज्यांमध्येही त्यांना प्रसिद्धी मिळालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील साखरवाडी या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मराठी भाषेतून त्यांनी कला शाखेची (बी.ए) पदवी पूर्ण केली.
शिंदे यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यापैकी गोष्ट 'छोटी डोंगरा एवढी' या चित्रपटातील त्यांनी कृषीमंत्री म्हणून केलेली भूमिका लक्षात राहण्यासारखी आहे.
जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात जाऊन त्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये काही काळ चर्चा देखील झाली.
जरांगे यांना शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली. आमच्यामध्ये काही चर्चा झाली नाही. कारण मी काही अभ्यासक नाही. मी फक्त इथे आलो, त्यांना भेटलो आणि चहापाणी घेतलं असे शिंदे म्हणाले.
मराठा आरक्षणावर बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, प्रत्येकाने रस्त्यावर उतरून ओरडलं पाहिजे, असं नसतं. पण त्या मोर्चाला पाठिंबा असणं महत्त्वाचं असतं. सत्याच्या बाजूने लोक नेहमीच उभे राहतात.