Rajanand More
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वाती यांनी गायलेल्या राम आएंगे या भक्तिगीताचे कौतुक. त्यांचा व्हिडीओही ट्विट केला.
रामलल्लाच्या स्वागतासाठी स्वाती यांनी गायलेले हे भजन मंत्रमुग्ध करणारे असल्याचे मोदी यांनी म्हटलं आहे.
स्वाती मूळच्या बिहारच्या असून लहानपणापासून गायनाची आवड. यू-ट्यूबवर तीन चॅनेल असून लाखो सबस्क्राबयर आहेत.
स्वाती यांनी राम आएंगे हे गीत 5 ऑक्टोबर रोजी यू-ट्यूबवर शेअर केले आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने त्या प्रकाशझोतात आल्या आहेत.
हे गीत आतापर्यंत जवळपास 43 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले आहे. त्याची पंतप्रधान मोदींकडूनही दखल.
स्वाती यांना हे गाणे तयार करण्यासाठी केवळ एक आठवडा लागला. पण यू-ट्यूबवर शेअर केल्यानंतर ते खूप हिट झाले.
स्वाती या बिहारमधील माला गावातील असून सध्या मुंबईत राहत आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक गाणी गायिली आहेत.
स्वाती मिश्रा यांना अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे.
कधी-कधी काही गोष्टी होऊन जातात, त्यावर विश्वासच बसत नाही. हा श्रीरामांचा आशीर्वादच आहे, अशी भावना स्वाती यांनी व्यक्त केली.