Actor Vijay Launches Political Party : तमिळनाडूच्या राजकारणाची बातच न्यारी, अभिनेते झाले नेते...

Roshan More

विजय

अभिनेता विजय याने नुकतीच 'तमिझागा व्हेत्री कझगम' या पक्षाची स्थापना केली आहे. हा पक्ष 2026 मध्ये तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणात अभिनेता ते नेता प्रवास करून तब्बल पाच जण मुख्यमंत्री झाले आहेत.

Vijay | sarkarnama

एम के स्टॅलिन

तमिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी देखील काही काळ अभिनेता म्हणून काही काम केले आहे.

M. K. Stalin | sarkarnama

कमल हसन

कमल हसन यांनी ‘मक्कल नीति मय्यम’ या पक्षाची स्थापना केली. मात्र, तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत कमल हसन यांना पराभूत व्हावे लागले.(Actor Vijay Launches Political Party )

Kamal Haasan | sarkarnama

रजनीकांत

रजनीकांत यांनी ‘रजनी मक्कल मंद्रम’ या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. मात्र, त्यांच्या पक्षाला कुठलेही भवितव्य दिसत नसल्याने त्यांनी आपला पक्ष विसर्जित केला.

Rajinikanth | sarkarnama

जयललिता

अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास असलेल्या जयललिता या तमिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगम या पक्षाच्या त्या सरचिटणीस होत्या.

jayalalitha | sarkarnama

करुणानिधी

सिनेमाचे पटकथा लेखक अशी ओळख असणारे करुणानिधी हे तमिळनाडूचे पाच वेळा मुख्यमंत्री झाले होते. अण्णादुराई यांच्या नंतर ते डीएमके पक्षाचे प्रमुख बनले.

karunanidhi | sarkarnama

एम.जी.रामचंद्रन

अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगम या पक्षाचे स्थापना एम जी रामचंद्रन यांनी केले. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे.

m g ramachandran | sarkarnama

विजयकांत

अभिनेते विजयकांत हे डीएमडीके पक्षाचे संस्थापक होते. 2011 ते 2016 या कालावधीमध्ये त्यांनी विरोधीपक्ष नेता म्हणून काम पाहिले. डिसेंबर 2023 मध्ये त्यांचे निधन झाले.

Vijayakanth | sarkarnama

NEXT : कठीण काळात सांभाळले 'ठाणे'; असा आहे मुख्यमंत्री पुत्राचा प्रवास

Shrikant Shinde | sarkarnama
येथे क्लिक करा