Roshan More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे व्यवसायाने डाॅक्टर आहेत. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी ते खासदार झाले.
शिवसेनेत फूट पडल्यांनतर एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले. त्या कठीण काळात ठाणे शहरात रस्त्यावर उतरून खासदार श्रीकांत शिंदे यांनी नेतृत्व केले. (Shrikant Shinde Birthday)
श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला शिवसेनेतून सुरुवात झाली. 2014 मध्ये पहिल्यांदा ते खासदार झाले.
श्रीकांत शिंदे हे आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजू, गरीब रुग्णांना मदत करत असतात.
रुग्णांना मदत करता यावी, त्यांची आर्थिक अडचण सोडवता यावी यासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विशेष टीम कार्यरत आहे.
श्रीकांत शिंदे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. 2024 च्या निवडणुकीत त्यांना हॅटट्रिकची संधी आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वे मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या लाईनचे काम मार्गी लावले आहेत.
श्रीकांत शिंदेंच्या विरोधात निवडणुकीसाठी कल्याणमधून ठाकरे गटाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र, शिंदेंना रोखणे ठाकरेंच्या पुढे मोठे आव्हान असणार आहे.
NEXT : यशस्वी अभिनेत्री-आंतरधर्मीय लग्न ते राजकारण; उर्मिला मातोडकरांची रंजक कहाणी!