Rashmi Mane
भारतीय राजकारणात सिनेमाचा प्रभाव मोठा राहिला आहे. अनेक लोकप्रिय कलाकारांनी लोकांच्या मनात स्थान मिळवून थेट सत्तेपर्यंत मजल मारली. अशा सहा दिग्गज कलाकारांनी मुख्यमंत्रीपद भूषवून इतिहास घडवला आहे.
तामिळ सिनेमातील सुपरस्टार असलेले MGR हे भारतातील पहिले अभिनेता मुख्यमंत्री ठरले. 1977 ते 1987 दरम्यान त्यांनी राज्यावर प्रभावी नेतृत्व केले. त्यांनी AIADMK पक्षाची स्थापना करून जनतेचा विश्वास जिंकला आणि अखेरपर्यंत अपराजित राहिले.
देवांच्या भूमिका साकारून प्रसिद्ध झालेले NTR हे तेलुगू सिनेमाचे चेहरा होते. त्यांनी 1983 मध्ये TDP पक्ष स्थापन केला आणि फक्त 9 महिन्यांत मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम केला. त्यांच्या नेतृत्वाने राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवला.
तामिळ आणि तेलुगू सिनेमातील आघाडीची अभिनेत्री असलेल्या जयललिता यांनी अनेक कार्यकाळ मुख्यमंत्रीपद सांभाळले. त्या फिल्म क्षेत्रातून आलेल्या पहिल्या बहुपदरी महिला मुख्यमंत्री ठरल्या आणि त्यांच्या नेतृत्वाने त्या देशातील प्रभावशाली नेत्या बनल्या.
MGR यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन मुख्यमंत्री बनल्या. त्यांचा कार्यकाळ फक्त 24 दिवसांचा होता. राजकीय अस्थिरतेमुळे त्यांना पद सोडावे लागले, पण त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या होत्या.
करुणानिधी हे अभिनेते नसले तरी प्रभावी पटकथाकार होते. त्यांनी सिनेमाचा वापर राजकीय विचार पोहोचवण्यासाठी केला. पाच वेळा मुख्यमंत्री बनून त्यांनी द्रविड चळवळ अधिक मजबूत केली.
आधुनिक काळातील सुपरस्टार विजय आता मुख्यमंत्री बनण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या TVK पक्षाने 2026 निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या. फक्त 2 वर्षांत त्यांनी हा यशाचा टप्पा गाठून NTR यांचा विक्रम मोडला आहे.