Rashmi Mane
थलपती विजय यांनी सिनेमात सुपरहिट कारकीर्द केल्यानंतर आता राजकारणातही दमदार एन्ट्री घेतली आहे. 2026 च्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत.
तमिळनाडूमध्ये विजय यांच्या पक्षाने 102 जागांवर आघाडी घेतली आहे. AIADMK आणि DMK यांना मागे टाकत मोठी कामगिरी केली आहे.
विजय पेरम्बूर आणि तिरुचिरापल्ली (ईस्ट) या दोन्ही जागांवर आघाडीवर आहेत. स्थानिक लोकांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळताना दिसत आहे.
निवडणूक जाहीरनाम्यानुसार विजय यांची एकूण संपत्ती 603.20 कोटी रुपये आहे.
थलपती विजय यांची प्रचंड संपत्ती आहे. 213 कोटींपेक्षा जास्त रक्कम बँक खात्यांत आहे. तर चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट आणि रिअल इस्टेटमधूनही मोठी कमाई होते.
विजय यांच्या पत्नी संगीता यांच्याकडे 15.76 कोटी रुपयांची संपत्ती आहे. विशेष म्हणजे कोणतीही कर्ज नाही.
विजय यांच्याकडे 883 ग्रॅम सोने, चांदीचे दागिने आणि BMW, Lexus, Vellfire सारख्या लक्झरी कार्स आहेत.
2024-25 मध्ये 184.53 कोटींची कमाई जाहीर करत विजय सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये आले आहेत. आता त्यांच्या राजकीय भवितव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.