Rahul Gandhi News : अदानी-अंबानी पासून मोदींवर टीका ते महालक्ष्मी लखपती योजना; राहुल गांधींच्या भाषणातील ठळक मुद्दे...

Chetan Zadpe

महालक्ष्मी योजना -

स्त्री-पुरुष दोघेही जॉब करतात. स्त्रीया घरचं सगळं काम करुन, मुलांचं सगळं बघून कामाला जातात. त्यासाठी त्या वेगळा मोबदला मागत नाहीत. त्यामुळे आम्ही स्त्रीयांसाठी महालक्ष्मी योजना आणणार आहोत.

Rahul Gandhi News | Sarkarnama

महिलांना वर्षाला एक लाख रुपये -

कोट्यवधी महिलांना काँग्रेस वर्षाला एक लाख रुपये देईल. महिन्याला ८ हजार ५०० रुपये मिळतील, अशी घोषणा राहुल गांधींनी केली.

Rahul Gandhi News | Sarkarnama

पदवीधर विद्यार्थ्यांना लाभ -

देशामध्ये कुणीही ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा होल्डर असेल त्याला अप्रेंटिशिप मिळेल. लाभार्थ्याला सरकारकडे ते मागण्याचा अधिकार असेल. 

Rahul Gandhi News | Sarkarnama

विद्यार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे -

युवकांना पहिल्या वर्षी एक लाख रुपये बँकेच्या अकाऊंटमध्ये येतील. या योजनेत युवकांना नोकऱ्यासुद्धा देण्यात येणार आहेत. पब्लिक सेक्टर, सरकारी कंपन्या, खासगी कंपन्यांमध्ये जॉब दिले जातील.

Rahul Gandhi News | Sarkarnama

शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे -

या देशातील अरबपतींचे कर्ज माफ होते. पण, शेतकऱ्यांचे माफ होत नाही. शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे.

Rahul Gandhi News | Sarkarnama

संविधान बदलू देणार नाही -

भाजप कितीही शक्तिशाली बनली तरी या देशाचे संविधान बदलू देणार नाही.

Rahul Gandhi News | Sarkarnama

इलेक्टोरल बाँड -

इलेक्टोरल बाँडमधील घोटाळा पकडला गेल्या भाजप चिंताग्रस्त झाली आहे. बाँड हा मोठा घोटाळा आहे.

Rahul Gandhi News | Sarkarnama

जातीनिहाय जनगणना -

भाजपा आदिवासी समाजावर अन्याय करते पण आदिवासी, दलित, मागासर्गीय, अल्पसंख्याक समाजाला सामाजिक न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्ष जातनिहाय जनगणना करणार व सामाजिक, आर्थिक सर्वे करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेईल, असे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi News | Sarkarnama

NEXT : महायुतीच्या सभेत इशारा, अजितदादांनी गाठले तानाजी सावंतांचे निवासस्थान

क्लिक करा...