Roshan More
मंत्री तानाजी सावंत यांनी महायुतीत, राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) उमेदवार यांच्या उमेदवार अर्चना पाटील यांना धारशिवमधून उमेदवारी मिळाल्याने ते नाराज होते. येथून सावंत यांचे पुतणे लढण्यास इच्छुक होते.
शिवसेनेचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला तर शिवसैनिक आणि मी स्वतः सहन करणार नाही, असा इशारा महायुतीच्या मेळाव्यात अजित पवारांच्या समोर तानाजी सावंत यांनी दिला होता.
सावंत यांनी मेळाव्यात नाराजी व्यक्त केल्यानंतर यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलण्याचे आश्वासन दिले होते.
आज (बुधवारी) अजित पवारांनी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुणे येथील निवासस्थानी जात सावंत परिवाराची सदिच्छा भेट घेतली.
उपमुख्यमंत्री अजित पवार सावंत कुटुंबियांच्या वतीने स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
अजित पवार-तानाजी सावंत यांच्यामध्ये या भेटी दरम्यान चर्चा झाली. मात्र या चर्चेचा तपशील समोर येऊ शकला नाही.
अजित पवारांनी तानाजी सावंत यांची भेट घेतल्याने सावंत यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा आहे.