Pradeep Pendhare
केंद्रीय लोकसभा आयोगाच्या परीक्षेत (UPSC) यवतमाळ जिल्ह्यातील अदिबा अहमद हिनं 142वी रँक मिळवत 'IAS' झाली.
राज्यात पहिली मुस्लिम महिला 'IAS' होण्याचा मान देखील अदिबा अहमद हिनं मिळवला आहे.
अदिबा अहमद हिचे वडील ऑटो रिक्षा चालक असून, कुटुंबाचा आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे.
अदिबा अहमद हिला 'UPSC'मध्ये तीन वेळा अपयश आलं, तरी अभ्यासात सातत्य ठेवलं होतं.
2020 मध्ये बी.एस्सी झाल्यानंतर अदिबाने हज हाऊस 'IAS' प्रशिक्षण संस्थेमध्ये आणि नंतर जामिया इस्लामी विद्यापीठात अभ्यास केला.
'UPSC'मध्ये यंदा निवड झालेल्या पहिल्या शंभरमध्ये इराम चौधरी (40 रँक) आणि फरखंडा कुरेशी (67 रँक) या दोन मुस्लिम उमेदवारांचा समावेश आहे.
2009 शाह फैसल या मुस्मिल युवकाने देशात अव्वल स्थान मिळवल्यानंतर मुस्लिम उमेदवारांचा 'UPSC'कडे ओढा वाढला.