Roshan More
शिवांश जागडे हा तरुण वयाच्या 22 व्या वर्षी युपीएससीची परीक्षा पास झाला आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससीच्या निकालात शिवांशने देशात 26 वे स्थान पटकावले तर तो महाराष्ट्रात दुसरा आला आहे.
शिवांश याचे वडील शेतकरी आहेत. तर, आई शिवणकाम करते.
शिवांश याने कोणताही क्लास न लावता सेल्फ स्टडीवर हे यश मिळवले.
शिवांश हा अवघ्या 22 वर्षाचा आहे. त्याने पहिल्यांदाच युपीएससीची परीक्षा दिली आणि यश मिळवले.
शिवांश याने बीएससी अॅग्रीमध्ये पदवीचे शिक्षण घेतले असून त्याने गणित विषय निवडला.
स्पर्धा परीक्षेसाठी योग्य नियोजन केले तर यश मिळते हे शिवांशने दाखवून दिले. खासगी क्लास न लावता 10 ते 12 अभ्यास करून त्याने हे यश मिळवले.