Rashmi Mane
आईनंतर आता अदिती यादव अखिलेशसोबत राजकीय कार्यक्रमात दिसली, अदितीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ओमर अब्दुल्ला यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव काल 16 ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाले होते.
तेव्हा अखिलेशसोबत त्यांची मुलगी आदिती यादव आणि मुलगा अर्जुन यादवही दिसले.
अखिलेश यादव यांनी त्यांच्या X सोशल मीडिया हँडलवर अनेक फोटो शेअर केले आहेत. या चित्रांचीही बरीच चर्चा होत आहे.
याआधीही आदिती राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसली होती.
या फोटोमुळे सपाची तिसरी पिढी राजकारणात येण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे अशी चर्चा होताना दिसत आहे.
याआधी लोकसभा निवडणुकीदरम्यान आदिती तिची आई डिंपल यादव यांच्यासाठी प्रचार करताना दिसली होती.
ठिकठिकाणी जाऊन छोट्या-मोठ्या सभा घेऊन डिंपल यादव यांना मतदान करण्याचे आवाहन करत होत्या.