Rashmi Mane
ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांच्या सरकारमध्ये पाच मंत्र्यांनीही शपथ घेतली.
या पाच मंत्र्यांमध्ये एक महिला आमदारही आहे. एनसीने सकिना इट्टू यांना महिला मंत्री म्हणून स्थान दिले आहे.
सकिना यांनी जम्मू-काश्मीरमधील डीएच पोरा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती.
विशेष म्हणजे सकिना इत्तू यांना दुसऱ्यांदा मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. याआधी सकिना 2009 मध्ये स्थापन झालेल्या ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारमध्येही मंत्री होत्या.
जम्मू-काश्मीरमधून एकमेव महिला मंत्री बनलेल्या सकिना इट्टू वयाच्या २६व्या वर्षी पहिल्यांदा आमदार झाल्या होत्या. 1996 मध्ये त्या जम्मू-काश्मीरच्या सर्वात तरुण आमदार होत्या.
5 डिसेंबर 1970 रोजी जन्मलेल्या सकिना इट्टू यांना राजकारणाचा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील वली मोहम्मद इट्टू हे जम्मू-काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष राहिले आहेत.
सकीना यांनी 1991 मध्ये जम्मू आणि काश्मीर स्टेट बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशनमधून इंटरमिजिएट पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण घेतले.
सकिना इट्टू यांचे वडील वली मोहम्मद यांची 18 मार्च 1994 ला एका मशिदीबाहेर हत्या करण्यात आली होती. वडिलांच्या हत्येनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.