Deepak Kulkarni
अदिती ऋषिकेश पोहरे या महाराष्ट्रातील एक प्राध्यापिका आणि राजकारणी म्हणून ओळखल्या जातात.
त्यांनी विधानपरिषद निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांना महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी मिळाली होती.
विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील या अटीतटीच्या लढतीत अदिती पोहरेंना पराभवाचा सामना करावा लागला.
शिवसेना (महायुती) चे उमेदवार किरण सरनाईक यांनी त्यांचा पराभव केला, तरीदेखील अदिती पोहरे या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या.तरी त्यांच्या पराभवाची जोरदार चर्चा सुरू आहे.
विदर्भातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेचे जाळं, राजकीय पाठबळ आणि महाविकास आघाडीची ताकद त्यामुळे अदिती यांच्या विजयाची अपेक्षा व्यक्त केली जात होती.
पोहरे यांना या निवडणुकीत प्रचाराचे नियोजन, शिक्षक संघटनांची भूमिका, बंडखोरी आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांचे गणित या सगळ्यांचा परिणाम पोहरे यांच्या पराभवात महत्त्वाचा ठरल्याचे चित्र आहे.
अदिती पोहरे यांच्यासमोर शिक्षक मतदारसंघातील विविध संघटना, त्यांची स्वतंत्र राजकीय भूमिका आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचे सर्वात मोठे आव्हान या निवडणुकीत होते.
या निवडणुकीत अनुभवाचा अभाव आणि ऐनवेळी उमेदवारीच्या रिंगणात उतरल्याचा मुद्दा त्यांच्या प्रचारासाठी अडचणीचा ठरल्याचे मानले जात आहे.