Jagdish Patil
राज्यभरात सध्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे.
लाडकी बहीण योजनेबाबची आत्तापर्यंतची सविस्तर अपडेट महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
या योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांना मंत्री अदिती तटकरे यांनी चांगलच सुनावलं आहे.
विरोधक पहिला दिवसांपासूनच या योजनेसंदर्भात टीका करत आहेत. मात्र, या योजनेला सर्वात जास्त प्रतिसाद मिळत आहे.
एका बाजूला टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला कॅम्प आयोजित करुन लोकांची दिशाभूल करायची. अशी भूमिका विरोधकांची असल्याचं त्या म्हणाल्या.
लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 72 लाखांपेक्षा जास्त अर्ज करण्यात आल्याचं अदिती यांनी सांगितलं.
ही योजना माता भगिनींसाठी किती उपयुक्त असून दररोज 8 ते 10 लाख अर्ज येत आहेत.
राज्य सरकारकडून या योजनेसाठी महिलांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे. तसंच ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने फॉर्म भरुन घेतले जात आहेत.