Akshay Sabale
अर्थमंत्री निर्मला सीतारमन 23 जुलै रोजी सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्पासह 6 अर्थसंकल्प सादर केले आहेत.
अर्थसंकल्पाशी संबंधित असलेल्या रंजक नावांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्यातील एक नाव Epochal. त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
1991 मध्ये पीव्ही नरसिंह राव यांचं सरकार होतं. या सरकारमध्ये अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग होते.
आर्थिक उदारीकरणाच्या युगाची सुरवात करणारा आणि लायसन्स राज संपुष्टात आणणार ऐतिहासिक अर्थसंकल्प डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यावेळी मांडला.
भारत आर्थिक पतनाच्या उंबरठ्यावर होता. त्यावेळी हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पामुळे परकीय गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला.
या अर्थसंकल्पानंतर अनेक मोठी पावले उचलण्यात आली. उदारहणार्थ सीमा शुल्क 220 टक्क्यांवरून 150 टक्क्यांवर आणण्यात आलं.
त्यासह निर्यातील चालना देण्यासाठी अनेक कठोर पावलंही उचलण्यात आली.