सरकारनामा ब्यूरो
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे या शिंदे सरकारमधील पहिल्या महिला मंत्री आहेत.
भरीव आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी अदिती तटकरेंना 'सकाळ सन्मान’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विलेपार्ले येथे 'सकाळ सन्मान सोहळा 2024' कार्यक्रम पार पडला.
महिला सक्षमीकरण व सामाजिक क्षेत्रात लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम कार्य केल्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विविध क्षेत्रातील सुमारे 24 कार्यकर्त्यांनाही यावेळी हा पुरस्कार देण्यात आला.
उद्योग, अभिनय, समाजसेवा आदी क्षेत्रांत भरीव काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हा पुरस्कार दिला जातो.
वंचित व शोषित महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे अदिती तटकरे यांचे प्रयत्न सुरू आहेत.