Pradeep Pendhare
उत्तराखंडच्या हरिद्वारमधील अदिती तोमर यांनी UPSC 2023 परीक्षेत 247 रँक मिळवली.
भाऊ उत्कर्ष तोमर हा 2021 च्या बॅचचा आयएएस अधिकारी आहे. सध्या ACP म्हणून तैनात आहेत. आदिती IAS साठी भावाला रोल माॅडेल मानतात.
अदिती यांचे वडील तेजवीरसिंग तोमर SMJN कॉलेजच्या वाणिज्य शाखेत प्राध्यापक आहेत. आई डॉ. शशीप्रभा तोमर या राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापक आहेत.
अदिती यांनी UPSC परीक्षेसाठी दररोज 8 ते 10 तास नियमित अभ्यास केला. परीक्षेला समोरे जाताना विषय चांगल्या प्रकारे समजून घेतला. लॅपटॉपवर बातम्या पाहायची.
अदिती यांनी UPSC परीक्षेत तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले. विशेष म्हणजे, कोणतेही कोचिंग घेतले नाही. टॉपर्सच्या नोट्स आणि कोचिंग मटेरियलमधून त्यांनी अभ्यास केला.
राजस्थानमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले आहे. यानंतर त्यांनी अर्थशास्त्रात मास्टर केले.
अदिती यांनी UPSC परीक्षेत यश मिळवण्यासाठी 2 ते 3 वर्षांपासून सोशल मीडियापासून दूर राहिल्या. फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरत नाहीत.
यूट्यूबवरून फक्त प्रेरणादायी व्हिडिओ आणि अभ्यासक्रमाशी संबंधित व्हिडिओ पाहाणे हा त्यांचा क्रम होता.