सरकारनामा ब्यूरो
आदित्य पांडे सक्सेस स्टोरी...
प्रेमात धोका मिळाल्यानंतर आयुष्य बरबाद करुन घेणारे खूप असतात पण बोटावर मोजता येतील असे काही लोक असतात, जे त्यातूनही सावरुन नवीन मार्ग काढतात. अशीच सक्सेस स्टोरी आहे आदित्य पांडे यांची.
आदित्य पांडे हे बिहारमधील पाटणामधील बिशुनपूर या गावातील रहिवाशी आहेत.
आदित्य यांना लहानपणापासून अभ्यासात अजिबात रस नव्हता. त्यामुळे ते अभ्यास न करता शाळेत गोंधळ, मस्ती यातचं दिवस घालवत.
एकदा त्यांचे शिक्षक त्यांच्या वागणूकीला कंटाळून त्यांच्या वडिलांकडे तक्रार करत म्हणाले होते. हा मुलगा अभ्यास करुन स्व:ताच्या पायावर उभा राहिला तर मी माझ्या मिशा कापेन.
आदित्य यांनी खूप मेहनत करुन 10 वी, 12वी ची परीक्षा उत्तीर्ण केली. इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यांनी एमबीए मध्ये पदवी मिळवली.
एमबीए करत असताना ब्रेकअप. लहानपणापासून जिच्यावर प्रेम होते ती साथ सोडली. त्यांनी यालाच नवीन सुरुवात मानून UPSCची परीक्षा देण्याचं ठरवल.
UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. 2021 मध्ये परीक्षा दिली पण त्यांना अपयश आले.
न हार मानता पुन्हा 2022 मध्ये परीक्षा देत संपूर्ण भारतातून 48वी रँक मिळवली.
आदित्य हे झारखंड कॅडरचे अधिकारी आहेत. त्यांची नियुक्ती सहाय्यक जिल्हाधिकारी पदासाठी झाली.