सरकारनामा ब्यूरो
बिपिन रावत यांचा आज तिसरा स्मृतीदिन आहे. ते 'फोर स्टार रँक' जनरल अधिकारी होते.
बिपीन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 उत्तरखंडतील पाउरी येथे झाला. त्यांच संपूर्ण कुटुंब हे लष्कराच होते.
त्यांचे वडील लक्ष्मण सिंघ रावत लेफ्टनंट जनरल होते. तर आई माजी आमदार किशन सिंघ यांची मुलगी.
जनरल बिपीन रावत हे भारतीय लष्करदलातील पहिले संरक्षणप्रमुख 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' (CDS) होते.
बिपीन यांची नियुक्ती भारतीय लष्कर दलात 30 डिसेंबर 2019 ला करण्यात आली होती.
रावत कर्मचारी समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी २६ वे लष्कर प्रमुख म्हणूनही कार्यभार सांभाळला.
कारगील युद्धात त्यांनी उल्लेखनीय काम केले.
8 डिसेंबर 2021 भारतीय हवाई दलाचे हेलिकॅाप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
त्यांना लष्कराचे विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना मरणोत्तर पद्मभूषण हा सन्मान देण्यात आला.