Aslam Shanedivan
UPSCने घेतलेल्या 2024 च्या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील चार ते पाच जणांनी लख्ख यश मिळवलं आहे. यात सर्वाधिक चर्चा होतेय ती मेंढपाळ असणाऱ्या बिरदेव डोने यांची.
बिरदेव डोने यांनी अत्यंत खडतर परिस्थितीशी दोन हात करत तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. ते कागल तालुक्यातील पहिले IPS बनले आहेत.
पण आजरा तालुक्यातील उत्तूर गावातील आदित्य अनिल बामणे यांचाही संघर्ष काही कमी नाही. त्यांनी अपंगत्वावर मात करत यूपीएससीत गरूडभराडी घेतली आहे
त्यांच्यावर वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत सहा शस्त्रक्रिया झाल्या असून सर्पदंशामुळे पायाला वाकडेपणा आणि एकाच डोळ्याची दृष्टी गेली.
आदित्य यांनी गेल्या वर्षी यूपीएससीने घेतलेल्या परीक्षेत यश मिळवले. पण मनासारखे न झाल्याने त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि 1004 वी रॅक मिळवली
आदित्य यांनी एकाच डोळ्याने अर्जुनाप्रमाणे लक्ष भेदत दहावीत 96 टक्के गुण मिळाले. पुढचे शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून मेरिटसह पदवी घेतली.
आदित्य यांनी वयाच्या 21व्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा क्रॅक करत टॅक्स इन्स्पेक्टर, सहाय्यक गट विकास अधिकारी नोकरी मिळवली.
विशेष म्हणजे कधी काळी एका नर्सने आदित्य यांना पोलिओ डोस काय कामाचा म्हणत हिणवलं होतं. आता त्याच आदित्य यांनी MPSCसह यूपीएससीत आजऱ्यासह कोल्हापूरचे नाव देश पातळीवर पोहचवले.