सरकारनामा ब्यूरो
लखनऊचे राहिवासी असणारे आदित्य श्रीवास्तव हे UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम उदाहरण आहेत.
आदित्य यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण लखनऊ येथील सीएमएस शाळेतून पूर्ण केलं. दहावीमध्ये त्यांना 97.8 टक्के,बारावीत 97 च्या पुढे मार्क मिळाले होते.
आदित्य यांचे वडील अजय श्रीवास्तव हे केंद्रीय लेखापरीक्षण विभागात AAO म्हणून कार्यरत आहेत.
जेईई मेन ॲडवान्स्ड परीक्षेत चांगली रँक मिळवत आयआयटी कानपूरमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक आणि एम.टेक केले.
त्यांनी UPSC परीक्षा दोनवेळा उत्तीर्ण केली. 2022 मध्ये आदित्य यांनी 236 वी रँकसह ते IPS झाले.
2023 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा UPSC ची परीक्षेत 1 नंबर रँक मिळवला. इतके चांगल्या रँकसह उत्तीर्ण होऊनही त्यांच्या वडिलांनी मार्कांमध्ये चुका काढल्या.
जेव्हा ते आयपीएस म्हणून रुजू झाले, तेव्हा त्यांचे वडील त्यांना म्हणाले की, आणखी चांगली रँक मिळाली असती तर तुला यूपी केडर मिळालं असतं.
मार्कशीट आल्यानंतर त्यांना निबंधात त्यांना 15 गुण कमी होते. यामुळे त्यांच्या वडिलांनी गंमतीनं म्हटलं की, निबंधात अजून थोडं चांगलं काम करता आलं असतं.