सरकारनामा ब्यूरो
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे दोनदिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत.
कोकणात एकत्र बसून चर्चा करण्याच्या पद्धतीला खळा बैठक म्हणतात.
कोकणात जागोजागी खळा बैठकी घेऊन तेथील जनतेशी संवाद साधला.
शिवसेना पक्षवाढीसाठी हा दौरा महत्त्वपूर्ण आहे.
कोकणातील जनतेचे प्रश्न व समस्या निराकरण करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याची चर्चा खळा बैठकीत झाली.
या बैठकांमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग होता.
सावंतवाडी आणि कुडाळ बांबर्डे या ठिकाणी मुख्यतः खळा बैठकी पार पडल्या.
कणकवली येथे दौऱ्याचा शेवट करून आदित्य ठाकरे राजापूरकडे रवाना झाले.
आदित्य ठाकरेंचा कोकणवासीयांसोबत संवाद साधण्याचा मुख्य हेतू होता.