Roshan More
मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पावसाने झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसानाची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत.
पैठण तालुक्यातील पाचोड येथे शेतीच्या बांधावर जाऊन आदित्य यांनी अवकाळी भागाची पाहणी केली. अवकाळीने झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते.
अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीनची पीकं पाण्याखाली गेली असताना बळीराजा हवालदिल झालाय. बळीराजाला वाऱ्यावर सोडू नका.तातडीने मदत द्या, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी सरकारला केले.
पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण गावातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
संकट कोणतंही असो, आम्ही बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.
मानवत तालुक्यातील वझुर व रामेटेकळी ह्या गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी आदित्य ठाकरेंनी केली.
आदित्य ठाकरेंसोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील पिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते.