सरकारनामा ब्यूरो
शिवसेना नेते आदित्य ठाकरे मथुरा दौऱ्यावर आहेत.
या दौऱ्यादरम्यान उत्तर प्रदेशवासीयांनी आदित्य ठाकरेंचे स्वागत केले.
मथुरेतील 500 वर्षे जुन्या ठाकूर 'श्यामा श्याम' या मंदिराचे उद्घाटन आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले.
आदित्य ठाकरे मथुरेतील कृष्णजन्मभूमी मंदिर, बांके बिहारी मंदिरासह अन्य मंदिरांनाही भेटी देणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी आदित्य ठाकरेंच्या आई रश्मी ठाकरेदेखील उपस्थित होत्या.
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी दिलेल्या खास निमंत्रणावरून ठाकरे कुटुंब मथुरा येथे पोहोचले.
ठाकरेंनी या दौऱ्यादरम्यान अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या.