Rashmi Mane
मनसे नेते अमित ठाकरे यांचे मेहुणे डॉ. राहुल बोरुडे यांच्या विवाहाचा भव्य स्वागत समारंभ 10 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वेलिंग्टन क्लबमध्ये पार पडला. राजकीय रसिकांचं लक्ष वेधणारा हा कार्यक्रम खास पाहुण्यांच्या उपस्थिती होती.
डॉ. राहुल बोरुडे यांचे लग्न दिल्लीमध्ये पार पडले होते. विशेष म्हणजे या लग्नाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः उपस्थित राहून नवदांपत्याला आशीर्वाद दिले होते. त्यानंतर मुंबईत शानदार स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला.
स्वागत समारंभात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित व मिताली ठाकरे यांसह छोटा किआन ठाकरेही उपस्थित होता. एकाच कार्यक्रमात दोन्ही ठाकरे कुटुंबांची उपस्थिती हीच मोठी चर्चा होती.
कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा मुलगा किआन यांच्यात मस्त मजा सुरू होती. आदित्य यांनी किआनसमोर हात पुढे केला, पण किआनने हात पुढे करू लागल्यावर त्यांनी खेळकरपणे हात मागे घेतला.
राज आणि उद्धव ठाकरे गप्पा मारत असताना किआनची एन्ट्री होताच सर्वांचे लक्ष त्याच्याकडे गेले. छोट्या किआनची मस्ती, त्याचे निरागस हावभाव आणि उत्साहामुळे समारंभात आनंदी वातावरण झाले.
किआन त्यांच्या जवळ येताच उद्धव ठाकरे यांनी त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला.
कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहजपणे संवाद करताना दिसले. दोघांचा साधा, मोकळा संवाद पाहून अनेकांनी हा अतिशय दुर्मिळ क्षण म्हणून नोंदवला.
अमित ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यातही शांत, हसऱ्या वातावरणात गप्पा रंगल्या. कुटुंबीयांमधील हा सौहार्दपूर्ण संवाद पाहून पाहुणेही आनंदी झाले.