देशात बंदी तरीही लोकसभेत खासदाराने ओढली ई-सिगारेट; काय आहे शिक्षेची तरतुद?

Jagdish Patil

भारत सरकार

भारत सरकारने ई-सिगारेटवर बंदी घातली असली. तरीही बेकायदेशीरपणे त्याचा वापर होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.

illegal e-cigarette use | Sarkarnama

अनुराग ठाकूर

आता तर थेट लोकसभेच्या सभागृहातच ई-सिगारेट ओढल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी केला आहे.

anurag thakur | Sarkarnama

खासदार

तृणमूल काँग्रेसच्या खासदारांकडून ई-सिगारेट ओढली जात असल्याचा दावा ठाकूर यांनी केला आहे.

e-cigarette ban india | Sarkarnama

ई-सिगारेट

त्यांच्या या आरोपामुळे 'ई-सिगारेट'चा मुद्दा चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर ई-सिगारेट म्हणजे काय आणि त्याचे धोके जाणून घेऊया.

e-cigarette ban india | Sarkarnama

ई-सिगारेट म्हणजे काय?

ई-सिगारेट म्हणजे एक बॅटरीवर चालणारे इलेक्टॉनिक उपकरण आहे. आतमध्ये निकोटीनचा थर असतो. त्याचे रुपांतर वाफेमध्ये किंवा धूरामध्ये होते.

e-cigarette | Sarkarnama

तंबाखू

ई-सिगारेटमध्ये तंबाखूचा वापर केला जात नसल्यामुळे त्यात राख तयार होत नाही आणि दातांवर डाग पडत नाहीत.

e-cigarette | Sarkarnama

लाईट

या सिगारेटच्या टोकाला LED लाईट असतो. सिगारेट ओढताना खऱ्या सिगारेटप्रमाणे प्रकाशमान होतं.

e-cigarette | Sarkarnama

दंड

ई-सिगारेट उत्पादन, विक्री आणि जाहिरातीवर देशात बंदी आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास एक वर्ष तुरुंगवास किंवा एक लाखांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात

e-cigarette | Sarkarnama

बंदी

केंद्र सरकारने 2019 मध्ये ई-सिगारेटवर बंदी घातली आहे. विद्यार्थ्यांमध्य ई-सिगारेटचा वापर वाढल्याने त्यावर बंदी घालण्यात आली.

e-cigarette | Sarkarnama

NEXT : भारतासह जगातील इतर कोणकोणत्या देशांमध्ये रुपया वापरला जातो माहितेय का?

Indonesian rupiah
क्लिक करा