Chetan Zadpe
आदित्य ठाकरेंनी आता न्यू लूक कॅरी केला आहे. क्लिन शेव्ह असा त्यांचा नवा अवतार आहे.
आदित्य ठाकरे फिकट निळ्या रंगाचा शर्ट आणि हातात असलेल्या ब्रॅण्डेड घड्याळामुळे चर्चेत असतात. आता मात्र त्यांच्या क्लिन शेव्ह लूकची चर्चा आहे.
दाढीबद्दल त्यांना विचारण्यात आले तेव्हा आदित्य म्हणाले, "दाढी बदलायला पाहिजे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडून आले आहेत. पहिल्यांदाच ते आमदार बनले आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण आणि पर्यटनमंत्री म्हणून काम केले आहे.
शिवसेनेतल्या अभूतपूर्व फुटीनंतर आदित्य ठाकरे यांनी पक्षाची धुरा सांभाळत सभांचा धडाका लावला होता.
शिवसेनेचे (ठाकरे गट) भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. युवा सेनेचे पदाधिकारी त्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतात.