Modi Government : नारायण राणेंसह मोदी सरकारमधील नऊ मंत्री होणार 'रिटायर्ड;' पुन्हा संसदेत की घरचा रस्ता...

Rajanand More

नारायण राणे

महाराष्ट्रातील भाजपचे महत्त्वाचे नेते असून त्यांच्याकडे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खाते आहे. भाजप त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवू शकते.

Narayan Rane | Sarkarnama

मनसुख मांडवीया

कोरोनाकाळात आरोग्यमंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी मिळाली. गुजरातमधून लोकसभा निवडणुकीत उतरू शकतात.

Mansukh Mandviya | Sarkarnama

धर्मेंद्र प्रधान

भाजपचे महत्त्वाचे नेते असून सध्या ते शिक्षण व कौशल्य विकासमंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीत उतरण्याची शक्यता.

Dharmendra Pradhan | Sarkarnama

अश्विनी वैष्णव

रेल्वे व माहिती तंत्रज्ञान या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी. वंदे भारतसह विविध नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका.

Ashwini Vaishnav | Sarkarnama

भूपेंद्र यादव

भूपेंद्र यादव हे पर्यावरण, वन व वातावरणीय बदल खात्याचे मंत्री आहेत. त्याचप्रमाणे रोजगार विभागही त्यांच्याकडे आहे.

Bhupendra Yadav | Sarkarnama

पुरुषोत्तम रुपाला

राज्यसभेची ही तिसरी टर्म. मत्स्य, पशुसंवर्धनमंत्री आहेत. गुजरातमधून लोकसभेचे तिकीट मिळू शकते.

Purushottam Rupala | Sarkarnama

राजीव चंद्रशेखर

मूळचे राज्यसभेचे असले तरी कर्नाटकातून राज्यसभेवर. ही तिसरी टर्म असून सध्या माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास विभागाचे राज्यमंत्री.

Rajeev Chandrashekhar | Sarkarnama

व्ही. मुरलीधरन

महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले मुरलीधरन मूळचे केरळचे. राज्यसभेची पहिलीच टर्म असून सध्या संसदीय कार्य राज्यमंत्री. पुन्हा राज्यसभेवर जाण्याची शक्यता.

V. Murlidharan | Sarkarnama

एल. मुरुगन

माहिती व प्रसारण राज्यमंत्री असलेले मुरुगन मध्य प्रदेशातून राज्यसभेवर. पहिलीच टर्म असून तमिळनाडूतून लोकसभा लढवू शकतात.

L. Murugan | Sarkarnama

NEXT : देशाचे सर्वात तरुण पोलिस महानिरीक्षक अरुण मोहन जोशी !

IPS Arun Mohan Joshi | Sarkarnama
येथे क्लिक करा