Jagdish Patil
मालवणधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याच्या घटनेचे पडसाद राज्याभरात उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर 'मविआ'ने मोर्च्याचं आयोजन केलं होतं.
याचवेळी भाजप नेते नारायण राणे पुत्र निलेश राणेंसह शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी किल्ल्यावर आले होते.
एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले ठाकरे आणि राणे आमने-सामने येताच कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.
राणे-ठाकरे समर्थक घोषणाबाजी करत एकमेकांच्या अंगावर धावून गेले. हा राडा सुरू असताना कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यामुळे निलेश राणे चांगलेच भडकले.
यानंतर राणेंनी आक्रमक पवित्रा घेत जागेवरून न हलण्याची भूमिका घेतली. शिवाय आदित्य ठाकरेंना दुसऱ्या बाजूने घालवण्याचा पर्याय पोलिसांना दिला.
पोलिसांनी सहकार्य करा म्हणताच, "10 फुटाचा रस्ता दिलाय, जायचं असेल तर त्यांना तिकडून जाऊद्या," असं म्हणत त्यांनी पोलिसांची विनंती धुडकावली.
दरम्यान, नारायण राणेंनी पोलिसांसमोरच ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना धकमी दिली. ते म्हणाले, "त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या. मी बघतो. घरात घुसून एक-एकाला रात्रभर मारेन, सोडणार नाही"
शिवाय त्यांनी पोलिसांना देखील इशारा दिला, "तुम्हाला मविआला सहकार्य करायचं असेल तर करा. पण यापुढे जिल्ह्यात तुम्हाला असहकार्य असेल," असं ते म्हणाले.