Akshay Sabale
केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. यापूर्वी मोहन भागवत यांना 'एएसएल' सुरक्षा देण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना यापूर्वी 'सीआयएसएफ'ची झेड प्लस सुरक्षा होती.
मोहन भागवत यांना मिळणाऱ्या 'एएसएल' या सुरक्षा यंत्रणेत देशातील कुठल्याही भागात प्रशासन, पोलिस, आरोग्य, अन्न व औषधी प्रशासन यांचा समावेश असणार आहे.
कुठलाही धोका टाळण्यासाठी मल्टी लेयर सुरक्षा प्रणाली मोहन भागवत यांना देण्यात येणार आहे.
मोहन भागवत यांच्या राहण्याच्या व्यवस्थेपासून ते प्रवास, भेटी आणि बैठकांच्या स्थळांची अत्यंत कडक सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्यात येणार आहे.
भागवत यांच्या दौऱ्यांपूर्वी सर्व ठिकाणी एक दिवस आधीच स्थळाचा संपूर्ण आढावा घेतला जाणार आहे.
मोहन भागवत हे अनेक भारतविरोधी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे गृह मंत्रालयाने मोहन भागवत यांना 'एएसएल' सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच काही राज्यांमध्ये गृह मंत्रालायला मोहन भागवत यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा दिसून आला होता.