Election Commission
Election Commission Sarkarnama
वेब स्टोरीज

Loksabha Election 2024 : चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोगासह प्रशासकीय यंत्रणा सज्ज!

Mayur Ratnaparkhe

पुणे लोकसभेसह अकरा लोकसभा मतदारसंघाचे मतदान सोमवारी पार पडत आहे.

यासाठी आवश्यक ती तयारी निवडणूक आयोगाने पूर्ण केली आहे.

अकरा लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होणार आहे. यासाठी 53 हजार 959 बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

29 हजार 284 मतदान केंद्र उपलब्ध करण्यात आली आहेत.

मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहेत.

मतदान केंद्रावर अचानक मशीन मध्ये काही बिघाड निर्माण झाल्यास काय करायचे याची माहिती देखील कर्मचाऱ्यांना दिली गेली आहे.

मतदान केंद्रांवर रविवारी संपूर्ण सेटअप लावण्यात आला असून त्याची चाचणी देखील घेण्यात आली आहे.

प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने घेतली जात आहे.

मतदारांच्या स्वागतासाठी मतदान केंद्र सजवली गेली आहेत.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदारांना फोटो काढण्यासाठी एक विशेष कटआउट उभारलं गेलं आहे.

Next : महाराष्ट्रातील ‘या’ दिग्गज नेत्यांसाठी चौथ्या टप्प्यात मतदान...

SCROLL FOR NEXT