Vijaykumar Dudhale
राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत बीडमध्ये पहायला मिळत आहे. या मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी आव्हान दिले आहे.
नगर दक्षिण मतदारसंघात डॉ. सुजय विखे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नीलेश लंके यांनी चॅलेंज दिले आहे.
जालना लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पुन्हा नशीब अजमावत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून कल्याण काळे हे मैदानात उतरले आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात दोन शिवसेनेत लढाई होत आहे. त्यात खासदार श्रीरंग बारणे शिंदेंच्या शिवसेनेकडून, तर संजोग वाघेरे हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा लढवत आहेत.
पुण्यात आमदार रवींद्र धंगेकर हे काँग्रेसच्या तिकिटावर भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. नंदूरबारमध्ये भाजपच्या हिना गावित यांना काँग्रेसचे डॉ. गोविल पाडवी यांचे आव्हान आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उद्योजक श्रीराम पाटील यांनी खासदार रक्षा खडसे यांना आव्हान दिले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ आणि शिवसेनेच्या करण पवार यांच्यात लढत होत आहे
खासदार सदाशिव लोखंडे यांना माजी खासदार भाऊसाहेब वाक्चौरे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात आव्हान उभे केले आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होत असून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे, शिंदे गटाचे संदीपान भुमरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील हे लढत आहेत.
राजकीय नेत्यांचा मदर्स डे; 'आई कसा होऊ उतराई?' पाहा खास फोटो!