Rashmi Mane
कॉलेजमध्ये प्रवेश घेताना कागदपत्रांची योग्य तयारी असणे खूप महत्त्वाचे असते. चुकीचे किंवा अपूर्ण कागदपत्र असेल, तर प्रवेशाची प्रक्रिया रखडू शकते. म्हणूनच ही यादी नक्की लक्षात ठेवा!
दहावीचा मार्कशीट (SSC Marksheet) किंवा बारावीचा मार्कशीट (HSC Marksheet)
शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate - LC)
रहिवासी प्रमाणपत्र
शासकीय उत्पन्न प्रमाणपत्र (शिष्यवृत्तीसाठी आवश्यक)
नॉन क्रिमिलेअर आणि जात प्रमाणपत्र
आधार कार्ड
पॅन कार्ड (असल्यास)
4 ते 6 फोटो आता काढलेले असावेत.
या सर्व दाखल्यांसाठी आधी गावच्या तलाठ्याकडून दाखले घ्यावे लागतात. तिथून 'आपले सरकार' किंवा 'महा ई सेवा केंद्र' इथे जावे. तिथे योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून तहसीलदारांच्या दाखल्यासाठी अर्ज करावा. नवीन नियमानुसार हे दाखले 48 तासात मिळू शकतात.